Thursday, July 29, 2010

साई गजानन ट्रस्टचा आगामी संकल्प

मुंबई २३ : साई गजानन ट्रस्ट ही वरळीतील एक नामवंत विश्वस्त संस्था असून धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तिचे कार्य अद्वितीय आहे; सेवाभावी कार्यकर्त्यांचा संच हेच साई गजानन ट्रस्टचे मुख्य भांडवल आहे; तिच्या या कार्याचा गौरव म्हणून तिला प्रगती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे; एड्स जनजागृती अभियान, नशाबंदी सप्ताह , स्वच्छता सप्ताह सारखे सामाजिक उपक्रम संस्था दरवर्षी राबवत असते; मोफत आरोग्य शिबीर, नेत्र चिकित्सा शिबीर, रक्त्तगट चाचणी शिबीर हे उपक्रमही संस्थेच्याद्वारे वर्षभर राबवले जातात; संस्थेच्यावातीने रामनवमी, गुरूपौर्णिमा, गणेशोत्सव, दत्तजयंती, विजयादशमी, तुलसी विवाह आदि उत्सव दरवर्षी उत्साहाने साजरे केले जातात; वरळी हा कामगारबहूल विभाग असल्याने इच्छा असूनही आर्थिक बाबीपायी साई गजानन ट्रस्टला मर्यादेतच काम करावे लागते; शालेय विद्यार्थ्याना वह्यांचे वाटप असो, नाहीतर त्यांचा गुणगौरव असो ; देणगीदारांनी केलेल्या सढळ मदतीमुळेच सामाजिक कार्य करणे साई गजानन ट्रस्टला शक्य होत असते; इच्छुक देणगिदारांनी saigajantrust@gmail.com वर अथवा ९८२१४६९०७२ या नंबरवर श्रीकांत मयेकर यांच्याशी संपर्क साधावा.

Tuesday, July 27, 2010

साईं गजानन ट्रस्ट, वरळीच्या वेब ब्लॉग आणि ईमेलचे अनावरण

मुंबई२७: वरळीच्या साई गजानन ट्रस्ट ने आपल्या वेब ब्लॉग आणि ईमेलचे अनावरण केले ; याप्रसंगी ट्रस्ट चे ट्रस्टी लवकुमार तावडे, उल्हास गावकर, प्रकाश पेंडकलकर, नरेन्द्र वाडेकर, श्रीकांत मयेकर, राजाराम भुवड, सुनील राऊत, नरहरी बोमाकंठी, मछिन्द्रनाथ पाटणकर उपस्थीत होते;