Monday, August 30, 2010

श्रीकांत मयेकर याना प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार

मुंबई २९: साई गजानन ट्रस्ट चे प्रमुख कार्यवाह श्रीकांत मयेकर याना दोस्ती संस्थेचा २०१० सालचा वृत्तपत्र लेखन व सामाजिक कार्याचा प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार प्राप्त झाला ; दादरच्या वनमाली सभागृहात मुंबईचे माजी महापौर महादेव देवले, मनसेचे कोल्हापूर संपर्क प्रमुख संजय जामदार, रिलायंस चे माजी उपाध्यक्ष रविन्द्र आवटी या मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार श्रीकांत मयेकर यांना देण्यात आला ; साई गजानन ट्रस्ट च्या वतीने श्रीकांत मयेकर यांचे हार्दिक अभिनन्दन!

Saturday, August 21, 2010

साई गजानन ट्रस्ट ची कार्यकारिणी

साई गजानन ट्रस्ट ची कार्यकारिणी
श्री लवकुमार तावडे - मुख्य विश्वस्त
श्री उल्हास गावकर - अध्यक्ष
श्री नरेन्द्र वाडेकर - कार्याध्यक्ष

श्री श्रीकांत मयेकर - प्रमुख कार्यवाह
श्री अरूण साखरकर - कोषाध्यक्ष
श्री सुनील राऊत - उपाध्यक्ष
श्री महेश निर्मल - उपकार्याध्यक्ष
श्री विनोद पाटिल - संयुक्त कार्यवाह
श्री जगन्नाथ राशिवाटे - उप कोषाध्यक्ष

कार्यकारिणी सदस्य :
श्री दिगंबर लोके , श्री अमित सातार्डेकर, श्री निरंजन बिरंबोळे, श्री अंकुश तावडे, श्री शंकर केसरकर, श्री रमेश जाधव, श्री संदीप केसरकर, श्री श्रीधर देशमुख, श्री सुधाकर बांदकर

इतर विश्वस्त:
श्री प्रकाश पेंडकलकर, श्री नरहरी बोमाकंठी, श्री राजाराम भुवड, मच्छिंद्रनाथ पाटणकर

Thursday, August 12, 2010

साईं गजानन ट्रस्टचे आगामी कार्यक्रम

मुंबई १२: साई गजानन ट्रस्ट च्यावतीने राबविण्यात येणारे आगामी कार्यक्रम:
१। भारताचा स्वातंत्र्यदिन
२। दही काला उत्सव
३। गणेशोत्सव
४। विजया दशमी महोत्सव
५। स्वच्छता सप्ताह
६। आरोग्य शिबीर
७। नेत्र चिकित्सा शिबीर
८। दीपोत्सव
९। नशाबंदी सप्ताह
१०। दत्त जयन्ती उत्सव
११। माघी गणेश जयन्ती उत्सव
१२। राम नवमी उत्सव
१३। शालेय विद्यार्थ्याना मोफत वाहया
14. gunavantaanchaa gunagourav
jyaa naa denagee dyaayachee aahe tyaanee 9821469072 yaa numbervar sampark karaavaa.

Thursday, July 29, 2010

साई गजानन ट्रस्टचा आगामी संकल्प

मुंबई २३ : साई गजानन ट्रस्ट ही वरळीतील एक नामवंत विश्वस्त संस्था असून धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये तिचे कार्य अद्वितीय आहे; सेवाभावी कार्यकर्त्यांचा संच हेच साई गजानन ट्रस्टचे मुख्य भांडवल आहे; तिच्या या कार्याचा गौरव म्हणून तिला प्रगती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे; एड्स जनजागृती अभियान, नशाबंदी सप्ताह , स्वच्छता सप्ताह सारखे सामाजिक उपक्रम संस्था दरवर्षी राबवत असते; मोफत आरोग्य शिबीर, नेत्र चिकित्सा शिबीर, रक्त्तगट चाचणी शिबीर हे उपक्रमही संस्थेच्याद्वारे वर्षभर राबवले जातात; संस्थेच्यावातीने रामनवमी, गुरूपौर्णिमा, गणेशोत्सव, दत्तजयंती, विजयादशमी, तुलसी विवाह आदि उत्सव दरवर्षी उत्साहाने साजरे केले जातात; वरळी हा कामगारबहूल विभाग असल्याने इच्छा असूनही आर्थिक बाबीपायी साई गजानन ट्रस्टला मर्यादेतच काम करावे लागते; शालेय विद्यार्थ्याना वह्यांचे वाटप असो, नाहीतर त्यांचा गुणगौरव असो ; देणगीदारांनी केलेल्या सढळ मदतीमुळेच सामाजिक कार्य करणे साई गजानन ट्रस्टला शक्य होत असते; इच्छुक देणगिदारांनी saigajantrust@gmail.com वर अथवा ९८२१४६९०७२ या नंबरवर श्रीकांत मयेकर यांच्याशी संपर्क साधावा.

Tuesday, July 27, 2010

साईं गजानन ट्रस्ट, वरळीच्या वेब ब्लॉग आणि ईमेलचे अनावरण

मुंबई२७: वरळीच्या साई गजानन ट्रस्ट ने आपल्या वेब ब्लॉग आणि ईमेलचे अनावरण केले ; याप्रसंगी ट्रस्ट चे ट्रस्टी लवकुमार तावडे, उल्हास गावकर, प्रकाश पेंडकलकर, नरेन्द्र वाडेकर, श्रीकांत मयेकर, राजाराम भुवड, सुनील राऊत, नरहरी बोमाकंठी, मछिन्द्रनाथ पाटणकर उपस्थीत होते;